जत तालुक्यातील ग्रामीण भाग हॉटस्पॉट चिंतेचा विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:07+5:302021-05-23T04:26:07+5:30
संख : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदक्षता समितीने अलर्ट राहावे. तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालले आहेत. हा चिंतेचा विषय ...

जत तालुक्यातील ग्रामीण भाग हॉटस्पॉट चिंतेचा विष
संख : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामदक्षता समितीने अलर्ट राहावे. तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालले आहेत. हा चिंतेचा विषय आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी दोन्ही डोसचे लसीकरण करून घ्यावे. विनामास्क विनाकारण फिरणाऱ्यांवर ग्रामदक्षता समितीनेे कारवाई करावी, असे आवाहन आ. विक्रम सावंत यांनी केले.
संख (ता. जत) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामदक्षता समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
ते म्हणाले, ग्रामदक्षता समितीने नागरिकांना विनाकारण फिरू देऊ नये. जनजागृती करा.
संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ जादा लस व औषधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल सावंत, सरपंच मंगल पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर कोळी, ग्रामविकास अधिकारी के. डी. नरळे उपस्थित होते.
कोरोनाच्या अनुषंगाने उमदी, कोंतवबोबलाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्गी, तिकोंडी, आसंगी तुर्क उपकेंद्रात आढावा बैठक घेण्यात आली.