कवी प्रदीप पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:26 IST2021-04-01T04:26:53+5:302021-04-01T04:26:53+5:30
आष्टा : येथील आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या वतीने प्रा. प्रदीप पाटील यांचा प्राचार्य विलास काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात ...

कवी प्रदीप पाटील यांचा सत्कार
आष्टा : येथील आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजच्या वतीने प्रा. प्रदीप पाटील यांचा प्राचार्य विलास काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. सर्जेराव गायकवाड, बी.के. माने, डॉ. प्रमोद ओलेकर, राजाराम पाटील, दत्तात्रय शिंदे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील आर्ट्स अॅण्ड कॉमर्स कॉलेजमधील मराठी विषयाचे प्राध्यापक व प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या ‘अंतरीचा भेद’ या कवितासंग्रहाचा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून समावेश झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. विलास काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बी.के. माने, प्रा. सर्जेराव गायकवाड, डॉ. प्रमोद ओलेकर, प्रा. राजाराम पाटील, ग्रंथालय प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या नववीच्या अभ्यासक्रमामध्ये कर्नाटक राज्याच्या बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये तसेच सोलापूर विद्यापीठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अभ्यासक्रमांमध्येही त्यांच्या कवितांचा समावेश झालेला आहे. त्यांचे ‘आत्मसंवाद’ व ‘अंतरीचा भेद’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित असून, त्यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारासह कोकण मराठी साहित्य परिषदेचा मराठी कविता राजधानी पुरस्कार, मुक्त विद्यापीठाचा विशाखा प्रथम पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, मराठवाडा साहित्य परिषद पुरस्कार असे प्रतिष्ठेचे अनेक सन्मान लाभले आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्या, काही कथाही वाङ्मयीन नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.