उपनगरांमध्ये दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:53+5:302021-02-05T07:30:53+5:30
इस्लामपूर : येथील खानजादे कॉलनी परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. गटारींची साेय नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नागरिकांच्या आराेग्याचा ...

उपनगरांमध्ये दुर्दशा
इस्लामपूर : येथील खानजादे कॉलनी परिसरात नागरी सुविधांची वानवा आहे. गटारींची साेय नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरिकांना साेयी-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी हाेत आहे.
--------------
कथाकथन स्पर्धेचे आयाेजन
सांगली : येथील सांगली महिला परिषदेतर्फे शनिवारी (दि. ६) महिलांसाठी कथाकथन स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे. यावेळी वन मिनिट शाे स्पर्धा हाेणार आहे. स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी महिला परिषदेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
जलवाहिनीचे काम सुरू
कुपवाड : येथील वाघमाेडेनगर परिसरात जलवाहिनीच्या कामास प्रारंभ झाला. यावेळी तानाजी सरगर, प्रकाश पाटील, अंकुश बंडगर, मारुती हंकारे, विनाेद गाडवे, सुनील कारंडे, राजू हाक्के, बिरू शिंदे, आनंदा मासाळ, कृष्णा माने, आदी उपस्थित हाेते.
---------------
रब्बी हंगाम जाेमात
ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, कार्वे, ढगेवाडी, शेखरवाडी परिसरात रब्बी हंगामातील पिकांनी जाेर धरला आहे. गहू, हरभरा, ज्वारीसह पिकांची स्थिती उत्तम असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त हाेत आहे. लवकरच पिकांची काढणी सुरू हाेणार आहे.
---------------