एक कोटी खर्चूनही लक्ष्मी मार्केटची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:31+5:302021-03-13T04:47:31+5:30
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट इमारतीच्या दुरुस्तीसाठी एक कोटींचा खर्च करूनपण पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी नवीन अंदाजपत्रक करण्याचे ...

एक कोटी खर्चूनही लक्ष्मी मार्केटची दुरवस्था
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट इमारतीच्या दुरुस्तीसाठी एक कोटींचा खर्च करूनपण पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी नवीन अंदाजपत्रक करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
मिरजेतील लक्ष्मी मार्केट इमारतीच्या दुरुस्तीसाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. नागरिक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीमुळे इमारत दुरुस्तीसाठी त्यांनी पाहणी केली. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मिळालेल्या शंभर कोटीतील एक कोटींचा निधी या इमारतीच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला आहे. हा निधी कशासाठी खर्च झाला याची विचारणा मिरजकर नागरिक करीत आहेत. दुरुस्तीसाठी एक कोटीच्या खर्चाचे अंदाजपत्रक महापालिका अधिकाऱ्यांनी तयार केले. यासाठी निधीही खर्च झाला असताना पुन्हा इमारतीला गळती लागल्याने इमारतीची कोणती दुरुस्ती केली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने अंदाजपत्रक करण्यात येत असल्याने महापालिकेत जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे.
चाैकट
ऑडिटची मागणी
सध्याचे सत्ताधारी मागील कारभाराबाबत बोलायला तयार नसल्याने, एकाच कामासाठी वारंवार खर्च सुरूच आहे. मागील एक कोटीतून कोणती कामे झाली याचे ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी आहे.