खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:35+5:302021-03-30T04:16:35+5:30
फोटो ओळी : कणदूर (ता. शिराळा) येथील दत्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अरुणा कोचुरे. लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत ...

खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घ्यावी
फोटो ओळी : कणदूर (ता. शिराळा) येथील दत्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अरुणा कोचुरे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : खेळाडूंनी शालेयस्तरापासूनच कौशल्य विकास साधत राष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी अरुणा कोचुरे यांनी केले.
कणदूर (ता. शिराळा) येथील दत्त विद्यालय व पी. डी. पवार उच्च माध्यमिक विद्यालयात नेहरू युवा केंद्राच्या वतीने घेण्यात असलेल्या बौद्धिक व क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. शिराळे खुर्दचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच लक्ष्मण सुर्ले, तालुका प्रतिनिधी प्रियांका पाटील, सुशांत पाटील, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब पाटील, मोहन पाटील, डॉ. अनिल खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक एस. के. पाटील यांनी प्रास्ताविक, तर सहदेव खोत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी फरीदा फकीर, बाळासाहेब पाटील, प्रल्हाद परीट, अजितकुमार शिंदे, राजश्री पवार, मालती करडे, श्रद्धा पाटील, राजश्री पाटील, प्रा. जयसिंग जाधव, प्रा. सुनील काशीद, प्रा. अमर पाटील, किरण शेळके, संपत पवार, मारुती कुंभार उपस्थित होते.