इस्लामपुरात शिवभोजन केंद्रावर पंचपक्वान्नाची थाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:30 IST2021-09-06T04:30:17+5:302021-09-06T04:30:17+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर येथील शिवभोजन केंद्रात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अडीचशे जणांना मोफत पंचपक्वान्नाची थाळी देण्यात ...

इस्लामपुरात शिवभोजन केंद्रावर पंचपक्वान्नाची थाळी
इस्लामपूर : इस्लामपूर येथील शिवभोजन केंद्रात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अडीचशे जणांना मोफत पंचपक्वान्नाची थाळी देण्यात आली.
येथील प्रशासकीय इमारतीच्या शेजारी पंगत डायनिंगमध्ये असणाऱ्या शासनमान्य शिवभोजन केंद्रावर वाढदिवस व शिक्षक दिनानिमित्त मोफत थाळीचा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी येथे सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. केंद्र संचालिका अलका शिंदे आणि रणजित शिंदे यांनी स्वागत केले. गेले वर्षभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच रुपयांत शिवभोजन थाळी गरजू नागरिकांची भूक भागवत आहे. रविवारी येणाऱ्या प्रत्येक भुकेल्या व्यक्तीचे आदराने स्वागत केले गेले अन् मोफत थाळी देण्यात आली. गेल्या दीड वर्षात शिवभोजन केंद्रावर तब्बल ६५ हजारांहून अधिक थाळींचे वितरण झाले आहे. गरजूंना पाच रुपयांची शिवभोजन थाळी जगण्याचा हातभार ठरली आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, अंकुश माने, ऋषिकेश शिंदे, नंदकिशोर नीळकंठ, अष्पाक जमादार, सुलाबाई साळुंखे उपस्थित होते.
फोटो : ०५ इस्लामपुर १
ओळ : इस्लामपूर येथे आनंदराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभोजन केंद्रात गरजूंना अन्नदान करण्यात आले.