सांगलीत जीवन विद्या मिशनची प्लास्टिकमुक्ती चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:28 IST2021-02-11T04:28:26+5:302021-02-11T04:28:26+5:30
नंदादीप हॉस्पिटलचे जागतिक नेत्रतज डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन यांनी स्वागत केले. सांगली–मिरज येथील जीवन विद्या मिशनचे सर्व ...

सांगलीत जीवन विद्या मिशनची प्लास्टिकमुक्ती चळवळ
नंदादीप हॉस्पिटलचे जागतिक नेत्रतज डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. माधवी पटवर्धन यांनी स्वागत केले. सांगली–मिरज येथील जीवन विद्या मिशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
सांगली येथील नंदादीप हॉस्पिटलचे जागतिक नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या पत्नी डॉ. माधवी पटवर्धन यांच्या संकल्पनेतून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याकरिता आजूबाजूच्या रहिवाशांना कचरा न फेकण्याचे व त्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन करून सांगली येथील नंदादीप हॉस्पिटल परिसरातील कचरा एकत्र जमवून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी गाडीभर कचरा पुणे येथील प्लास्टिक-ते-इंधन च्या प्लॅन्टला पाठवला जातो. उपक्रमाचे नियोजन व मदत राजेंद्र जोशी, अर्चना लेले, हिमांशु लेले, संजय कट्टी, विजय गुदले, महेश कुलकर्णी, मिलिंद जाधव, रोहन कोठारी, महेश सुतार, सचिन चव्हाण, पवन ठोंबरे, वासंती लेले, राजन जोशी, दिलीप कारंडे करीत आहेत.
कोट
पर्यावरण म्हणजे नारायण असे जीवन विद्येचे तत्वज्ञान आहे. त्याला अनुसरूनच या उपक्रमात जीवनविद्येचे सर्व नामधारक सहभागी झाले आहेत. सांगली-मिरजमध्ये भरपूर प्रमाणात प्लास्टिक कचरा असल्याने सामाजिक संस्था व नागरिकांनी मिळून ठिकठिकाणी कचरा एकत्र करून या उपक्रमात सहभागी व्हावे.
- डॉ. दिलीप पटवर्धन, सांगली
फोटो ओळ : सांगली येथे प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियानात प्रबोधन करताना जीवनविद्या मिशनचे कार्यकर्ते.