वृक्षारोपण व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:42+5:302021-06-16T04:35:42+5:30
फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथे आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा ...

वृक्षारोपण व संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य
फोटो : चिंचणी (ता. कडेगाव) येथे आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शांताराम कदम, श्रीरंग चव्हाण, लालासाहेब महाडिक उपस्थित होते.
कडेगाव :
सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने कर्तव्य म्हणून वृक्षारोपण करावे, असे आवाहन सहकार व कृषिराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
आमदार मोहनराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचणी (ता. कडेगाव) येथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा १ हजार वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा प्रारंभ सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले, चिंचणी येथील ग्रामस्थांनी सुरू केलेला वृक्षलागवडीचा
उपक्रम आदर्शवत आहे. प्रमुख रस्त्यावरील वाढती रहदारी आणि रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन योग्य अंतर ठेवून वृक्षारोपण करावे.
यावेळी नंदकुमार माने, उपसरपंच दीपक महाडिक, संजय पाटील, अशोक महाडिक, कैलास माने, जलाल मुल्ला, अकबर मुल्ला, विश्वास महाडिक, लालासोा महाडिक, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
तरुणांचे कौतुक
चिंचणी येथे वृक्ष लागवडीसाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. याबद्दल डॉ. विश्वजित कदम यांनी तरुणांचे विशेष कौतुक केले.