रेड बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST2021-07-02T04:18:27+5:302021-07-02T04:18:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : रेड (ता. शिराळा) येथे युवा मित्र विक्रम सातपुते व अक्षय सातपुते यांच्या संकल्पनेतून बसस्थानक ...

Plantation in the vicinity of Red bus stand | रेड बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

रेड बसस्थानक परिसरात वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : रेड (ता. शिराळा) येथे युवा मित्र विक्रम सातपुते व अक्षय सातपुते यांच्या संकल्पनेतून बसस्थानक परिसरामध्ये वृक्षारोपण केले. यासाठी प्लॅनेट अर्थ फाऊंडेशन शिराळा या संस्थेकडून झाडांची रोपे पुरविण्यात आली. गेल्या वर्षभरापासून शिराळा ते पेठ नाका या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे बऱ्याच झाडांची तोड करण्यात आली होती. ही बाब लक्षात घेऊन सातपुते यांनी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.

याप्रसंगी बाबासाहेब सातपुते, विक्रम सातपुते, अक्षय सातपुते, संदीप सातपुते, रवींद्र सातपुते, शरद पाटील, राहुल सातपुते, राजाराम सातपुते, प्रशांत सातपुते, अरविंद सातपुते, महेश सातपुते, रोहन सातपुते, संग्राम सातपुते, अतुल सातपुते, अनिकेत सातपुते, अशोक सातपुते, ऋषिकेश माने, प्रतीक सातपुते, तेजस सातपुते, आराध्य सातपुते यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले.

Web Title: Plantation in the vicinity of Red bus stand