आष्ट्यात अस्थिविसर्जन करून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:10+5:302021-03-04T04:51:10+5:30

आष्टा येथील बाजीराव चव्हाण यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन नदीच्या पाण्यात न करता वृक्षारोपण करताना तानाजी चव्हाण, अमरसिंह चव्हाण व विकास ...

Plantation by ossification in Ashta | आष्ट्यात अस्थिविसर्जन करून वृक्षारोपण

आष्ट्यात अस्थिविसर्जन करून वृक्षारोपण

आष्टा येथील बाजीराव चव्हाण यांच्या निधनानंतर अस्थिविसर्जन नदीच्या पाण्यात न करता वृक्षारोपण करताना तानाजी चव्हाण, अमरसिंह चव्हाण व विकास बोरकर.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी बाजीराव शामराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. चव्हाण कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थींचे नदीऐवजी मातीत विसर्जन करून वृक्षारोपण केले.

येथील फूल उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या बाळासाहेब चव्हाण यांचे बंधू बाजीराव चव्हाण यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अस्थींचे विसर्जन चव्हाण यांच्या शेतात आंब्याची रोपे लावून करण्यात आले. यावेळी फूल उत्पादक तानाजी चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, संभाजी चव्हाण, अमरसिंह चव्हाण, दिग्विजय चव्हाण, श्रीवर्धन चव्हाण, विकास बोरकर, अजित माने, अण्णासाहेब कवठेकर, आनंदराव काळोखे, सुहास लांडे, किरण सावंत, पोपट पाटील, संजय यादव-पाटील उपस्थित होते. चव्हाण कुटुंबीयांनी वृक्षारोपण करून अस्थिविसर्जन करीत समाजासमोर आदर्श घालून दिला आहे.

Web Title: Plantation by ossification in Ashta