इस्लामपुरात ‘क्रेडाई’तर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:16+5:302021-06-22T04:19:16+5:30
इस्लामपूूर येथे अरविंद माळी, अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी अमोल यादव, प्रवीण फल्ले, महेश माळी, गणेश पाटील ...

इस्लामपुरात ‘क्रेडाई’तर्फे वृक्षारोपण
इस्लामपूूर येथे अरविंद माळी, अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी अमोल यादव, प्रवीण फल्ले, महेश माळी, गणेश पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. सोशल वर्क कमिटीचे अध्यक्ष अमोल यादव यांनी क्रेडाई युथ विंगच्या सहभागातून ५०० वृक्षांचे रोपण करणार असल्याचे सांगितले. झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, ट्री गार्ड बसविणे, भविष्यात पाणी देणे असा प्रकल्प राबविला जाणार आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व वाळवा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये ५९ शाखांमध्ये क्रेडाई संघटना कार्यरत आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सांगली व इस्लामपूर येथे शाखा आहेत.
यावेळी मुख्याधिकारी माळी यांनी क्रेडाईचे कार्य पर्यावरणपूरक असल्याचे प्रशंसोद्गार काढले. अजिंक्य कुंभार म्हणाले, नवीन सर्व वसाहतींमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी राजाराम खांबे, आरोग्य विभागाचे मुश्रीफ यावेळी उपस्थित होते.
क्रेडाई इस्लामपूरचे कार्यवाह महेश माळी यांनी भविष्यात सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष गणेश पाटील, अमोल यादव, यशवंत गणवंत, नितीन फल्ले, प्रवीण फल्ले, सुनील फार्णे उपस्थित होते.