नेर्ले येथे जयंत फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:35 IST2020-12-30T04:35:44+5:302020-12-30T04:35:44+5:30

नेर्ले : कुसुमताई राजाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जयंत फाउंडेशन यांच्यावतीने नेर्ले येथे स्मशानभूमी रस्त्यालगत विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच ...

Plantation on behalf of Jayant Foundation at Nerle | नेर्ले येथे जयंत फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

नेर्ले येथे जयंत फाऊंडेशनच्यावतीने वृक्षारोपण

नेर्ले : कुसुमताई राजाराम पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जयंत फाउंडेशन यांच्यावतीने नेर्ले येथे स्मशानभूमी रस्त्यालगत विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण सरपंच छायाताई रोकडे, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण व्हावे, याकरिता स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपणाचे उपक्रम राबवत असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास कृष्णा साखर कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, अनिल साळुंखे, कृष्णाजी माने, विजय पाटील, एकनाथ पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष अमर शिंदे, विशाल पाटील, खंडू गडाळे, हिरोजी पाटील, प्रकाश कदम, जयकर पाटील, सुजित जामदार, विक्रम पाटील, बाळासाहेब रोकडे, अमोल खुडे, विशाल पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते.

फोटो : २९१२२०२०-आयएसएलएम- नेर्ले न्यूज

ओळ : नेर्ले (ता. वाळवा) येथे कुसुमताई पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त सरपंच छायाताई रोकडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संजय पाटील, अमर शिंदे, दिलीप पाटील उपस्थित होते.

Web Title: Plantation on behalf of Jayant Foundation at Nerle