बाबासाहेब चितळे महाविद्यालयात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:57+5:302021-07-03T04:17:57+5:30

भिलवडी : भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात राजू दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. भिलवडी शिक्षण संस्थेचे ...

Plantation at Babasaheb Chitale College | बाबासाहेब चितळे महाविद्यालयात वृक्षारोपण

बाबासाहेब चितळे महाविद्यालयात वृक्षारोपण

भिलवडी : भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात राजू दादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे, गिरीश चितळे, मकरंद चितळे, यशवंत उर्फ राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्षारोपण चळवळ गरजेची असल्याचे प्रतिपादन विश्वास चितळे यांनी केले. यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के. किणीकर, जयंत केळकर, संजय कदम, संपत पाटील, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, शहाजी गुरव, शशिकांत माने, सचिन पाटील, संजय येसुगडे, शशिकांत यादव, प्रवीण पाटील आदींसह भिलवडी शिक्षण संकुलातील सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. श्रीकांत चव्हाण यांनी आभार मानले.

फोटो : ०२ भिलवडी १

ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे बाबासाहेब चितळे महाविद्यालयात वृक्षाराेपणप्रसंगी राजू पाटील, विश्वास चितळे, गिरीश चितळे, डॉ. बाळासाहेब चोपडे, मकरंद चितळे, संजय कदम, संपत पाटील उपस्थित हाेते.

020721\img-20210702-wa0473.jpg

फोटो - भिलवडी येथे वृक्षारोपण करताना राजू पाटील,विश्वास चितळे,गिरीश चितळे, डॉ.बाळासाहेब चोपडे,मकरंद चितळे,संजय कदम,संपत पाटील आदी.

Web Title: Plantation at Babasaheb Chitale College