शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वारणा नदी, चांदोली धरणाच्या प्रकल्पावर फुली; सांगलीला कृष्णेतूनच शुद्ध पाणी देण्याची योजना

By अविनाश कोळी | Updated: February 28, 2024 15:19 IST

सांगली : वारणा नदीही नको अन् चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी अधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शुध्द  करुन मुबलक पाणी ...

सांगली : वारणा नदीही नको अन् चांदोली धरणही नको. कृष्णा नदीतील उपलब्ध पाणी अधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शुध्द  करुन मुबलक पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी स्वतंत्र तज्ज्ञांचीही नियुक्ती करण्याचा विचार आहे, असे स्पष्ट करीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सुनिल पवार यांनी   दोन्ही योजनांच्या वादावर पडदा टाकला. दोन्ही प्रस्तावीत पाणी योजना खर्चिक असल्याने ते प्रस्ताव प्रशासनाने प्रलंबित ठेवल्याचे स्पष्ट केले.दुषित पाणी पुरवठ्यावरुन  सामाजिक संघटनांच्या बैठकीत आयुक्त सुनिल पवार यांनी वारणा की चांदोली पाणी पुरवठा योजनेवर आपली भूमिका स्पष्ट केली. पाणी टंचाईमुळे कृष्णा नदी वारंवार कोरडी पडत असल्याने भविष्यात पाण्यासाठी स्वतंत्र स्त्रोत शोधावा लागणार असल्याने वारणेतून पाणी आणण्याच्या २५० कोटीच्या योजनेचा आग्रह मदनभाऊ पाटील युवा मंचने धरला होता, दुसरीकडे  नागरीक जागृती मंचने चांदोली धरणातून पाणी आणण्याचा आग्रह धरला होता.यावरुन आंदोलनही झाले होते. मदनभाऊ पाटील युवा मंचने वारणा पाणी योजनेसाठी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने वारणेचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्‍वासन दिले होते. नागरीक जागृती मंचने चांदोलतून थेट पाईपलाईनव्दारे पाणी आणण्याचा आग्रह धरला होता. यावरुन युवा मंच आणि नागरीक जागृती मंच यांच्यात राजकीय वादही निर्माण झाले होते.    कालच्या बैठकीत बोलताना आयुक्त पवार म्हणाले, मुबलक,शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी  जुन्या वितरण नलिका बदलणे गरजेचे आहे.कृष्णेचे पाणी दुषित असल्याने प्रस्तावीत वारणा पाणी योजनेचा प्रस्ताव चर्चेला आला.यातून मिळणारे पाणीही दुषित असल्याचे दिसून आले. चांदोलीतून थेट पाईपलाईनव्दारे सांगलीला पाणी आणण्याचा प्रस्ताव चर्चेला आला.१४०० कोटीचा खर्च यासाठी येईल असे सांगीतले जाते. यात मनपा ५०० कोटीचा हिस्सा घालावा लागणार आहे.हा खर्च परवडणार का? शासन अनुदानावर महापालिका चालते आहे. या सर्व बाबीचा विचार करुन आहे ते पाणी अधुनिक तंत्रज्ञानाने शुध्द देता येईल का? यासाठी प्रस्ताव करण्याचे काम सुरु केले आहे,यासाठी स्वतंत्र तज्ञांची नियुक्ती करण्याचा विचार आहे.१६००-१७०० कोटीची योजना करण्यापेक्षा  उपलब्ध पाणी शुध्द आणि मुबलक देण्यासाठी नविन तंत्रज्ञान वापरण्याचे नियोजन आहे. आयुक्त सुनिल पवार यांच्या स्पष्ट खुलाशामुळे  वारणा आणि चांदोली पाणी योजना सध्या तरी गुंडाळल्या आहेत असे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीriverनदीWaterपाणी