मार्केट यार्डात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:43+5:302021-06-10T04:18:43+5:30
----- श्यामनगरच्या कूपनलिकेची सोय फोटो : ०९शीतल ०१ सांगली : श्यामनगर येथील खुला भूखंड व कंजारभाट समाज स्मशानभूमीत नव्याने ...

मार्केट यार्डात खड्डे
-----
श्यामनगरच्या कूपनलिकेची सोय
फोटो : ०९शीतल ०१
सांगली : श्यामनगर येथील खुला भूखंड व कंजारभाट समाज स्मशानभूमीत नव्याने कूपनलिका बसविण्यात आली. नगरसेविका सोनाली सगरे यांच्या निधीतून हे काम करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र कुंभार, सचिन नगरकर, मारुती पाटील, महेश सागरे उपस्थित होते.
--------
गटाई कामगारांना मदत
(फोटो ०९ शीतल ०२)
सांगली : शहरातील गटाई कामगारांना सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तोहिलभाई कडलास्कर, अब्दुल पीरजादे, रमीझ कडलास्कर, ओंकार कांबळे, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, रवींद्र वादवणे उपस्थित होते.
-------
गटारीतील कचऱ्याची विल्हेवाट
सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील भोबे गटारीतून महापालिकेने १७ टन गाळ, कचरा काढला होता. पावसाळ्याच्या तोंडावर हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे.