शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ताकारी योजनेच्या कालव्याखालील पाईप फुटला, सोनहिरा खोऱ्यातील शेती पिके धोक्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 10:53 IST

कालवा अस्तरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड यंत्राच्या सहाय्याने माती काढताना पाईप फुटल्याने ताकारी योजनेच्या कालव्याला भगदाड पडले.

ठळक मुद्देकडेगाव तालुक्यात चिंचणी-भवनीनगर रस्त्यावरील कालवा पुलालगत असलेल्या ओघळीचे पाणी कालव्याच्या खालून जाण्यासाठी सिमेंट पाईप बसवला आहे.कालवा अस्तरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड यंत्राच्या सहाय्याने माती काढताना हा पाईप फुटल्याने ताकारी योजनेच्या कालव्याला भगदाड पडले.करपून चाललेली सोनहीरा खोऱ्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत.

कडेगाव - कडेगाव तालुक्यात चिंचणी-भवनीनगर रस्त्यावरील कालवा पुलालगत असलेल्या ओघळीचे पाणी कालव्याच्या खालून जाण्यासाठी सिमेंट पाईप बसवला आहे. कालवा अस्तरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने पोकलँड यंत्राच्या सहाय्याने माती काढताना हा पाईप फुटल्याने ताकारी योजनेच्या कालव्याला भगदाड पडले. यामुळे योजनेचा तिसरा टप्पा बंद करण्यात आला आहे. आधीच करपून चाललेली सोनहीरा खोऱ्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत.

अस्तरीकरणाच्या कामासाठी व ठेकेदाराची वाहने येण्याजाण्या रास्ता अरुंद आहे म्हणून ठेकेदाराने चक्क पोकलँडच्या साहाय्याने कालव्यातील माती काढून रुंदीकरणासाठी  रस्त्यावर भरली त्यावेळी माती काढताना कालव्याखालून ओघळीचे पाणी जाण्यासाठी बसविलेल्या सिमेंट पाईपमधील एक पाईप फुटला. यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. विलंबाने सुरू झालेल्या ताकारी योजनेचा तिसरा टप्पा बंद झाल्यामुळे सोनहिरा खोऱ्यातील शेतीपिके धोक्यात आली आहेत. सोनहीरा खोऱ्यातील शेतकरी वर्गातील संताप व्यक्त होत आहे .

मोहित्यांचे वडगाव येथे ताकारी योजनेचा तिसरा टप्पा आहे. येथून पुढे आसद, चिंचणी, वाजेगाव, पाडळी, सोनकीरे, शिरसगाव, सोनसळ, अंबक, तडसर, हिंगणगाव (खुर्द) या गावांच्या शेतीपिकांना या कालव्याद्वारे पाणी जाते. या कालव्यात शनिवारी पाणी सोडले आणि आधीच फुटलेल्या पाईपमधून अवर्तनचे पाणी कालव्याबाहेर भवानीनगर चिंचणी रस्त्यालगतच्या नाल्यातून वाजेगावच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाहून गेले. यामुळे  सोनहिरा खोऱ्यातील कोमेजून चाललेल्या शेतीपिके आता वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

अधिकारी व ठेकेदारावर कारवाईची मागणी 

ताकारी योजनेच्या चिंचणी भवानीनगर रस्त्यावर असलेल्या कालवा पुलाच्यालगत  असलेल्या ओघळीवर कालव्याच्या पुलाखालून सिमेंट पाईप बसवला असल्याची माहिती योजनेच्या अधिकाऱ्यांनी जुना नकाशा पाहून देणे गरजेचे होते परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदाराने मनमानी कारभार करीत कालव्यातील माती काढल्याने पाईप फुटली. यामुळे दोषी अधिकारी आणि चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

तातडीने पाणी द्या अन्यथा आंदोलन 

भगदाड पडलेला कालवा दुरुस्तीचे काम तातडीने करून सोनहीरा खोऱ्यातील होरपळणाऱ्या शेतीला पाणी द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिरसगाव, सोनसळ, सोनकीरे, चिंचणी, वाजेगाव, तडसर, हिंगणगाव खुर्द, आसद व अंबक येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. 

ठेकेदाराकडून गळती  काढण्याचे काम सुरू 

पाईप फुटल्यावर संतप्त शेतकऱ्यांनी योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदारास तातडीने गळती  काढण्यास सांगितले आहे. आता ठेकेदारांनी  या फुटलेल्या पाईपवर काँक्रीट टाकून गळती काढण्याचे काम सुरू केले आहे. 

 

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी