पिकअप शेडचे काम अखेर पूर्ण
By Admin | Updated: August 11, 2014 00:21 IST2014-08-10T20:27:45+5:302014-08-11T00:21:18+5:30
लोकमत प्रभाव

पिकअप शेडचे काम अखेर पूर्ण
मांजर्डे : आरवडे (ता. तासगाव) येथील पिकअप् शेडच्या अपूर्ण कामाबद्दल ‘लोकमत’ने आठच दिवसांपूर्वी वृत्त प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने अपूर्ण काम पूर्ण केल्यामुळे ‘लोकमत’चे परिसरातून व ग्रामस्थांतून अभिनंदन होत आहे.
आरवडे (ता. तासगाव) येथील पिकअप् शेडचे काम अपूर्ण होते. शेडमध्ये प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे महिला प्रवासी, वयोवृध्द, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची गैरसोय होत होती. आरवडे हे तासगाव, भिवघाट रस्त्यावरील एक मोठे गाव असून, संख्या मोठ्या प्रमाणात असते, परंतु शेडचे काम अपूर्ण असल्याने नाराजी व्यक्त होत होती. ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता.
याबाबत ‘लोकमत‘मध्ये वृत्त प्रसिध्द झाले. याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने पिकअप् शेडचे काम पूर्ण केले. यामुळे ग्रामस्थ, प्रवाशांतून ‘लोकमत’चे अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)