शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

प्राणीमित्रांनी मुक्त केले चिमणीच्या पिलांना - : सांगलीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 23:44 IST

: माणसाचा सहजीवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी, चिमण्यांच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. चिमणी संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना,

ठळक मुद्देएकमेकांना चिकटलेले दोन्ही पिलांचे पाय केले वेगळे; इन्साफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना यश

सांगली : माणसाचा सहजीवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी, चिमण्यांच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. चिमणी संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना, अ‍ॅनिमल फाऊंडेशनच्या पथकाने मंगळवारी पाय चिकटलेल्या दोन चिमण्यांची मुक्तता करीत, त्यांचे विहाराचे स्वप्न साकार केले.

शिवोदयनगरमधील घराबाहेर एका बंद दुचाकीच्या हेडलाईट कव्हरच्या मोकळ्या जागेत चीरक (इंडियन रॉबिन) या चिमणीने घरटे बांधले. विणीचा हंगाम सुरू असल्याने लगबगीने हे घरटे तयार केले. तिला दोन पिली झाली. चोचीत अन्न, पाणी आणून ती पिलांना भरवायलाही लागली. पिली उडण्याच्या अवस्थेला आल्यानंतर किलबिलाट सुरू झाला. पिली उडायचा प्रयत्न करायची आणि खाली पडायची. पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात सोडले, की पुन्हा तोच प्रकार व्हायचा. त्या दोन्ही पिलांचा एक पाय एकमेकांना जन्मजात चिकटला होता. पिले खाली पडली की कुत्री, मांजरी त्यांच्यावर ताव मारण्यासाठी टपून बसलेली असायची. त्यामुळे पिलांच्या आईचा जीव टांगणीला लागला होता.

तेथील नागरिकांनी इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्याशी संपर्क साधला. मुजावर यांच्यासह मंदार शिंपी व जावेद शेख या प्राणीमित्रांनी तातडीने धाव घेतली. घरट्यातून पिलांना बाहेर काढले आणि पाहणी केली, तर दोन्ही पिलांचे पाय चिकटले होते. त्यातच एक दोराही अडकल्याने एका पिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. प्राणीमित्रांनी अत्यंत कष्टाने व अलगदपणे दोन्ही पिलांना स्वतंत्र केले. एका चिमणीच्या पायाला कापड बांधून दोघांनाही घरट्यात पूर्ववत ठेवण्यात आले. दोन्ही पिलांना जीवदान मिळाले. इन्साफ फाऊंडेशनच्या या कार्यकर्त्यांनी चिमणीच्या घरट्यातील हानिकारक धागेही बाजूला केले.काय आहे पक्ष्याचे वैशिष्ट्य...हा पक्षी झुडपी रानात, तसेच शहरात आणि खेडेगावामध्येही दिसतो. या पक्ष्याचा मुख्य आहार म्हणजे किडे, कोळी. या पक्ष्याची शेपटी उभारलेली असते आणि पंख शेपटीच्या बाजूंवर पाडलेले असतात. नर काळा कुळकुळीत, तर मादी तपकिरी रंगाची असते. 

घरट्यात पुन्हा किलबिलप्राणीमित्रांकडून पिलांवर उपचार सुरू असताना तसेच पिलांचीही वेदनेने तडफड होत असताना तिच्या आईच्या जिवाची घालमेल सुरू होती. पिलांसाठी तिचा आरडाओरडा सुरू होता. पिली सुखरूप व स्वतंत्र होऊन घरट्यात परतल्यानंतर मात्र लगेचच तिने चोचीतून अन्न आणून पिलांना भरविले. बराच वेळ शांत असलेल्या घरट्यात पुन्हा किलबिलाट सुरू झाला.

टॅग्स :social workerसमाजसेवकbirds sanctuaryपक्षी अभयारण्य