सांगलीत पेट्रोल १०६.०२ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:55+5:302021-07-08T04:17:55+5:30

सांगली : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीत पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. पेट्रोल ४४.६७ पैशांनी महाग झाले असून, बुधवारी १०६.०२ ...

Petrol in Sangli is Rs 106.02 | सांगलीत पेट्रोल १०६.०२ रुपये

सांगलीत पेट्रोल १०६.०२ रुपये

सांगली : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीत पुन्हा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. पेट्रोल ४४.६७ पैशांनी महाग झाले असून, बुधवारी १०६.०२ रुपयांवर पोहोचले तर डिझेलच्या दरात १७ पैशांनी वाढ झाली.

जून महिन्यात सांगली जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली होती. आता दररोज इंधनाचे दर वाढू लागल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. जुलै महिन्यातही पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ कायम आहे. दि. २ व ३ जुलै रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली नव्हती. त्यानंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली. दि. ५ व ६ जुलैला पेट्रोलचा दर १०५.६९ रुपये तर डिझेल ९५.२५ रुपये इतके होते. बुधवारी त्यात आणखी वाढ झाली. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे.

चौकट

आ‌ठवड्यातील स्थिती पेट्रोल

१ जुलै : १०४.६८

२ जुलै : १०५.०२

३ जुलै : १०५.०२

४ जुलै : १०५.३५

५ जुलै : १०५.६९

६ जुलै : १०५.६९

७ जुलै : १०६. ०२

डिझेल

१ जुलै : ९५.०६

२ जुलै : ९५.०६

३ जुलै : ९५.०६

४ जुलै : ९५.१२

५ जुलै : ९५.२५

६ जुलै : ९५.२५

७ जुलै : ९५.४२

Web Title: Petrol in Sangli is Rs 106.02

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.