महापालिका आयुक्ताविरोधात राज्य माहिती आयोगाकडे याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:01+5:302021-06-26T04:20:01+5:30

सांगली : महापालिकेच्या वीज बील घोटाळ्याबाबत माहिती देण्यास आयुक्त नितीन कापडणीस यांनी टाळाटाळ केली, तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती न ...

Petition to the State Information Commission against the Municipal Commissioner | महापालिका आयुक्ताविरोधात राज्य माहिती आयोगाकडे याचिका

महापालिका आयुक्ताविरोधात राज्य माहिती आयोगाकडे याचिका

सांगली : महापालिकेच्या वीज बील घोटाळ्याबाबत माहिती देण्यास आयुक्त नितीन कापडणीस यांनी टाळाटाळ केली, तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती न देण्याबाबत लेखी आदेश दिल्याने राज्य माहिती आयोगाकडे याचिका दाखल केल्याचे सामाजिक कार्यकर्ते वि. द. बर्वे यांनी सांगितले.

बर्वे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, महापालिकेच्या वीज बिलात २०१९ ते २०२० या वर्षात एक कोटी २९ लाखांचा घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती, पण मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून २३ मार्च अपील दाखल केले. यावर महापालिकेच्या अपिलीय अधिकाऱ्यांनी ३० मार्चपर्यंत माहिती देण्याचे आदेश दिले. मात्र, यानंतरही कोणती माहिती देण्यात आली आलेली नाही. ही माहिती मुदतीत न दिल्याने अखेर राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाकडे २५ मे रोजी अपील केले आहे. मात्र, खंडपाठीकडूनही कोणतीही नोटीस, समन्स आलेले नाही.

वीज बिल घोटाळ्याप्रकरणी आयुक्त कापडणीस जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. मी न्यायालयात जाणार असल्याच्या भीतीपोटी माहिती देत नाहीते हे स्पष्ट झाल्याचे बर्वे यांनी याचिकेत म्हटले आहे. आयुक्तांवर दप्तर दिरंगाई कायद्यान्वये कारवाई करावी व २५ हजारांचा दंड करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Petition to the State Information Commission against the Municipal Commissioner