पेठला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:03+5:302021-06-01T04:20:03+5:30
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील भीमनगर परिसरातील प्रकाश धर्मा पवार यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण करून जखमी करण्यात ...

पेठला जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील भीमनगर परिसरातील प्रकाश धर्मा पवार यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली. हा प्रकार रविवार रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
याप्रकरणी प्रकाश पवार (वय ५७) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदीप बाळासाहेब पाटील, ऋषिकेश बाळासाहेब पाटील आणि दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध मारहाणीसह अनुसूचित जाती-जमाती, अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे.
पेट्रोल पंपावर काम करीत असताना तीन दिवस बदली दिली नाही, या कारणातून संदीपने प्रकाश पवार यांच्याशी झटापट करत त्यांच्या उजव्या हाताचे बोट पिरंगाळून मोडले, तसेच रविवारी रात्री वरील चौघांनी प्रकाश पवार यांच्या घरासमोर जाऊन जातिवाचक शिवीगाळ करीत धमकावले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे अधिक तपास करीत आहेत.