शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कमानीस परवानगी नाकारली, मिरजेत ठाकरे गटाचे पोलिसांविरोधात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 13:01 IST

यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे.

मिरज : मिरजेत विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वागत कमानीवर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी हक्क सांगितल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना स्वागत कमानीस परवानगी नाकारली आहे. स्वागत कमानीस परवानगी न देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विसर्जन मिरवणूक मार्गावरील भव्य स्वागत कमानी मिरजेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. आठवडाभर स्वागत कमानीची परवानगी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. दोन्ही गटांनी माघार घेण्यास नकार दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कमानीस परवानगी नाकारल्याची लेखी सूचना शुक्रवारी दोन्ही गटांना दिली. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने कमानीस परवागनी मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला.

जिल्हाप्रमुख विभुते व माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी ४० वर्षांच्या परंपरेनुसार शिवसेनेच्या स्वागत कमानीला परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली. परवानगी मिळेपर्यंत कमानीच्या जागेवर शुक्रवारपासून शिवसेना कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला. पोलिसांनी आम्हाला तुरुंगात टाकावे किंवा कमानीला परवानगी द्यावी, याबाबत आता माघार घेणार नसल्याचेही विभुते यांनी सांगितले.यावेळी तानाजी सातपुते, संदीप माळी, सुनीता मोरे, चंद्रकांत मैगुरे, आनंद रजपूत, केदार गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संघर्षाची चिन्हे

ठाकरे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमेसह निष्ठा सर्वोच्च असल्याचा संदेश आहे. शिंदे गटाच्या कमानीवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. मात्र दोन्ही कमानींना पोलिसांनी परवानगी नाकारल्याने यावरून संघर्षाची चिन्हे आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGanesh Mahotsavगणेशोत्सव