शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:14+5:302021-01-13T05:08:14+5:30
सांगली : सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट तातडीने करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अवैध मेडिकलविरोधी कृती समितीचे ...

शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट करा
सांगली : सांगलीच्या शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट तातडीने करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अवैध मेडिकलविरोधी कृती समितीचे उमर गवंडी यांनी अधिष्ठातांना दिली.
समितीचे गवंडी, आसीफ बावा, साहील खाटीक व कार्यकर्त्यांनी रविवारी सांगलीच्या शासकीय रुग्णालयास भेट देऊन येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिराळा रुग्णालय वगळता जिल्ह्यातील एकाही शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अधिष्ठातांशी संपर्क साधला. गवंडी म्हणाले की, भांडारा येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट तातडीने करावे. येथील ऑडिट प्रलंबित आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटल हे रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. येथे उत्तम प्रतीचे उपचार होत असतात; पण प्रशासकीय कामकाज हे राम भरोसे आहे. सांगली जिल्ह्यात फक्त शिराळा उपकेंद्राचेच फायर ऑडिट झाले आहे. अन्यत्र कोठेच झालेले नाही. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे भंडाऱ्यासारखी स्थिती आपल्याकडे झाल्यास त्यास प्रशासन जबाबदारी राहील. येत्या ७ दिवसांत फायर ऑडिटचे काम पूर्ण न झाल्यास किंवा ते मार्गी न लावल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.