लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक गुणवत्तेकडेच लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:27 IST2021-02-16T04:27:52+5:302021-02-16T04:27:52+5:30

जयंत पाटील म्हणाले, पाचवीच्या मुलाला तिसरीचे वाचता येत नाही, हे आपणास भूषणावह आहे का? नश्चितच नाही. मग, तुम्ही कोणत्याही ...

People's representatives should pay attention only to the quality of education | लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक गुणवत्तेकडेच लक्ष द्यावे

लोकप्रतिनिधींनी शैक्षणिक गुणवत्तेकडेच लक्ष द्यावे

जयंत पाटील म्हणाले, पाचवीच्या मुलाला तिसरीचे वाचता येत नाही, हे आपणास भूषणावह आहे का? नश्चितच नाही. मग, तुम्ही कोणत्याही पक्षात असला तरी शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांचा शैक्षणिक पाया पक्का झाला पाहिजे. मुलांना शाळेची गोडी लागली पाहिजे, असे शिक्षण शाळेत देण्याची गरज आहे. यासाठीच जिल्ह्यातील १४१ शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. मूलभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्ता वाढविणार आहे. यासाठी शिक्षक-पालक संवाद वाढविला पाहिजे. गुणवत्ता वाढविणाऱ्या शाळांना पाच ते दहा लाखांपर्यंत बक्षीस देण्यासाठी पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेत दानशूर लोकांकडून गोळा करून त्यातून तो खर्च केला पाहिजे. हा निधी खर्चाचे सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्याची गरज आहे.

सभापती आशा पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांनी स्वागत केले. उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी आभार मानले.

चौकट

गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची रिक्त पदे भरणार

जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी दि. १७ रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा कोरे यांनी मंत्रालयात यावे. मी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

चौकट

वशिलेबहाद्दरांना सोडून डुडींना सांगलीला आणले

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी अनेकांनी बड्या मंडळीकडून वशिला लावला होता. त्यांना सर्वांना बाजूला सारून केवळ शैक्षणिक गुणवत्तेची जितेंद्र डुडींना आवड असल्यामुळे त्यांची भेट घेऊन सांगलीला आणले. त्यांचे कार्य पाहून त्यांची मी केलेली निवड शंभर टक्के योग्य आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: People's representatives should pay attention only to the quality of education