काेकरूड पाेलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:19+5:302021-02-24T04:28:19+5:30
कोकरुड : तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी असली तरी त्यात वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाबरोबरच कोकरूड पोलिसांकडून उपाययाेजना करण्यात ...

काेकरूड पाेलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्यांना दंड
कोकरुड : तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाची संख्या कमी असली तरी त्यात वाढ होऊ नये यासाठी प्रशासनाबरोबरच कोकरूड पोलिसांकडून उपाययाेजना करण्यात येत आहेत. पश्चिम भागात अनेक ठिकाणी चेकपोस्ट तयार केले असून, अवघ्या चार दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या १२० नागरिकांवर कारवाई करून २४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोकरूड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा-चांदोली मार्गांवर विविध ठिकाणी नियमितपणे तपासणी नाके सुरू ठेवण्यात आले आहेत. नियमापेक्षा जास्त लोक एकत्र येऊन प्रवास करणे, विनामास्क फिरणे, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी गर्दी करणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे अशांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सातत्याने येत आहेत. त्यानुसार गेल्या चार दिवसांत कोकरूड पोलिसांनी १२० लोकांवर कारवाई केली. २४ हजार रुपये दंड वसूल केला. कारवाईत साहाय्यक निरीक्षक ज्ञानदेव वाघ, साहाय्यक फौजदार कदम, अर्जुन पाटील, सतीश पाटील सुहास डाकवे सहभागी आहेत.