मिरजेत शिवाजी रस्त्यावर अपघातात पादचारी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:03 IST2020-12-05T05:03:30+5:302020-12-05T05:03:30+5:30

मिरजेतील शिवाजी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण व रस्त्यावरच वाहने पार्क केल्यामुळे वारंवार वाहतुकीला अडथळा होत आहे. अतिक्रमणांमुळे रस्ता लहान झाल्याने ...

Pedestrian injured in road accident in Miraj | मिरजेत शिवाजी रस्त्यावर अपघातात पादचारी जखमी

मिरजेत शिवाजी रस्त्यावर अपघातात पादचारी जखमी

मिरजेतील शिवाजी रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण व रस्त्यावरच वाहने पार्क केल्यामुळे वारंवार वाहतुकीला अडथळा होत आहे. अतिक्रमणांमुळे रस्ता लहान झाल्याने अपघात होत आहेत. बुधवारी या रस्त्यावर वाहनांच्या गर्दीतून रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचार्‍याला ट्रकने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी पादचाऱ्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Pedestrian injured in road accident in Miraj