पाटकऱ्याच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:18+5:302021-02-05T07:20:18+5:30
इस्लामपूर : उरुण परिसरातील खेड रस्त्यावरील शेतात पाणी सोडण्याच्या किरकोळ कारणातून पाटकऱ्याचा खून करणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत ...

पाटकऱ्याच्या खुनातील संशयितास पोलीस कोठडी
इस्लामपूर : उरुण परिसरातील खेड रस्त्यावरील शेतात पाणी सोडण्याच्या किरकोळ कारणातून पाटकऱ्याचा खून करणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास ही खुनाची घटना घडली. त्यानंतर अवघ्या आठ तासात गुन्हे शाखेने संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
प्रशांत बाबूराव पाटील असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने लोखंडी गजाने डोक्यात जोराचा फटका मारून अशोक आनंदा पाटील (वय ४३, रा. साखराळे) यांचा खून केला. संशयिताने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हल्ल्यात त्याने वापरलेला लोखंडी गज मिळालेला नाही
रविवारी दुपारी संशयित आरोपी प्रशांतचे वडील बाबूराव पाटील यांनी रस्त्यावर पाणी सोडत असल्याच्या कारणातून पाटकरी अशोक पाटील यांना शिवीगाळ केली होती. हा वाद परिसरातील शेतकऱ्यांनी मिटविला होता. मात्र सोेमवारी वडिलांच्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून प्रशांत याने अशोक पाटील यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शेडगे अधिक तपास करीत आहेत.