परिचारकांच्याकडून आईच्या ममतेने रुग्णसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:57+5:302021-05-13T04:27:57+5:30
फोटो ओळ : तासगाव येथे परिचारिका दिनानिमित्त विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी परिचारिकांचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक ...

परिचारकांच्याकडून आईच्या ममतेने रुग्णसेवा
फोटो ओळ : तासगाव येथे परिचारिका दिनानिमित्त विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी परिचारिकांचा सत्कार केला. यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, डॉ. विजय जाधव उपस्थित होते.
तासगाव :
गेली वर्षभर कोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून परिचारिका काम करत आहेत. डॉक्टरांना आपण देव मानतो, पण डॉक्टरांच्या बरोबरीनेच रुग्णांशी थेट संपर्कात असणाऱ्या व आईच्या प्रेमाने रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिका या देवासमान आहेत, असे गौरवोद्गार तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी काढले.
परिचारिका दिनानिमित्त तासगाव येथील आदित्य हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन तासगाव पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन परिचारिकांचा सन्मान केला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, गोंदियाच्या पोलीस निरीक्षक पल्लवी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, नगरसेवक अभिजित माळी, डॉ. विजय जाधव, डॉ. कविता जाधव आदी उपस्थित होते.
अश्विनी शेंडगे म्हणाल्या, परिचारिका थेट रुग्णाच्या संपर्कात असतात. प्रसंगी एखाद्या कुटुंबातील सदस्यांपेक्षा जास्त ओढीने त्या रुग्णांची सेवासुश्रुषा करतात. कोरोना काळातील परिचारिकांच्या कामगिरीचे मूल्यांकन अशक्य आहे.