शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! धावत्या रेल्वेतच मिळणार कन्फर्म तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:40 IST

अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याला यंत्रामुळे आळा बसेल

सांगली : चालत्या रेल्वेत प्रवाशांची तिकीट तपासणी करून प्रसंगी दंडाच्या पावत्या फाडणारे तिकीट तपासणीस सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या हातात आता पावती पुस्तकाऐवजी हॅण्ड हेल्ड टर्मिनल यंत्रे (एचएचटी) येणार आहेत. पुणे विभागात त्यांचे वितरण सुरू झाले आहे. यामुळे प्रवाशांना धावत्या गाडीतच तिकीट मिळणार आहे.प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवाशांना तपासणीसाकडून दंडाच्या पावत्या लिहून दिल्या जातात. जनरलचे तिकीट काढून स्लीपर बोगीत बसलेल्यांनाही अतिरिक्त प्रवास शुल्काची पावती द्यावी लागते. यासह अनेकविध कारणांसाठी तपासणीसाला पावत्या फाडाव्या लागतात. हे काम आता एचएचटी यंत्राद्वारे केले जाईल. ही यंत्रे ऑनलाइन प्रणालीद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला जोडलेली असतील. पैसे दिल्यानंतर यंत्रातून त्याची पावती निघेल. त्याची ऑनलाइन नोंद रेल्वेकडे होईल. सध्या एसटीचे वाहक, पतसंस्थांचे पिग्मी एजंट, रेशनिंग दुकाने अशा ठिकाणी या प्रकारची यंत्रे वापरली जातात.रेल्वेत कन्फर्म तिकिटासाठीही यंत्राचा वापर होईल. धावत्या रेल्वेत एखादी सीट रिकामी असेल, तर त्याची नोंद यंत्रामध्ये केली जाईल. रेल्वेतच प्रवाशाच्या मागणीनुसार कन्फर्म तिकीट दिले जाईल. अनेकदा तपासणीसाला हाताशी धरून प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. याला यंत्रामुळे आळा बसेल.पुणे विभागात ९६ यंत्रे आली आहेत. मिरज स्थानकात ५७ यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक तपासणीसांकडे एक यंत्र देण्यात येईल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे