शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ३० तास स्टेशनवर 'तो' बेशुद्ध होता अन् दुर्लक्षामुळे गेला जीव; किर्लोस्कवाडीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By अविनाश कोळी | Updated: April 29, 2025 19:12 IST

स्टेशन प्रबंधक यांना आरपीआय व भाजपच कार्यकर्त्यांकडून मागणीचे निवेदन 

किर्लोस्करवाडी : येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर शनिवारी २६ ते रविवार दि. २७ एप्रिलपर्यंत तब्बल ३० तास एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत पडून होता. त्याच्याकडे ना रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले ना अन्य कुणी. त्यामुळे त्याचा जीव गेला. याप्रकरणी आरपीआय व भाजपच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे.  येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक नागरिक बेशुद्ध अवस्थेत आढळला. तो प्रवासी म्हणून तिथे उतरला होता. ३० तासानंतर काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावर रेल्वे प्रशासनाने १०८ ला फोन करून सांगली सिव्हिल येथे त्याला पाठवून दिले. परंतु उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. या व्यक्तीवर वेळेत प्रथमोपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. दररोज हजारो प्रवासी असणाऱ्या या स्टेशनवर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिस यांचा वावर असतो. निष्काळजीपणामुळे निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

संबंधित प्रकरणात त्या दिवशी ड्युटीवर असलेले स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिस अधिकारी यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक मोर्चा आणि आरपीआयच्यावतीने स्टेशन प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी धनंजय माने, निहाल नदाफ, राजू मुजावर हजर होते.

..तर तीव्र आंदोलन करुदहा दिवसांत सदर अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अमीर पठाण यांनी दिला आहे. 

सदरच्या व्यक्तीला बाहेरच्या कुणीतरी आणून सोडले असावे. आम्ही त्याला चौकशी करून काही फळे खायला दिली होती. स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही. - मुरलीधर, स्टेशन प्रबंधक.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासीDeathमृत्यू