रेल्वे आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दरामुळे प्रवाशांना भुर्दंड

By Admin | Updated: September 9, 2016 21:03 IST2016-09-09T21:03:54+5:302016-09-09T21:03:54+5:30

मिरजेतून जाणा-या यशवंतपूर-जोधपूर व यशवंतपूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसना यापूर्वीपासूनच प्रिमियम दराची आकारणी सुरू आहे.

Passengers are paid for premium tickets for railway tickets | रेल्वे आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दरामुळे प्रवाशांना भुर्दंड

रेल्वे आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दरामुळे प्रवाशांना भुर्दंड

style="text-align: justify;">सदानंद औंधे, ऑनलाइन लोकमत 
मिरज, दि. ९ - रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी शुक्रवारपासून प्रिमियम दर लागू करण्यात आले आहेत. मिरजेतून जाणा-या यशवंतपूर-जोधपूर व यशवंतपूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसना यापूर्वीपासूनच प्रिमियम दराची आकारणी सुरू आहे. तात्काळ आरक्षित तिकिटांप्रमाणे साधारण आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दराच्या आकारणीमुळे रेल्वे प्रवाशांना भुर्दंड बसणार आहे.
 
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरक्षित रेल्वे तिकिटांना मोठी मागणी असल्याने आरक्षित तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी पाच वर्षापूर्वी तात्काळ तिकीट आरक्षण सुरू करण्यात आले. जादा आरक्षण शुल्काची आकारणी करून उपलब्ध होणाºया तात्काळ तिकिटांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांचीही सोय झाली. रेल्वे सुटण्याच्या एक दिवस अगोदर मिळणा-या तात्काळ तिकिटांना मागणी वाढल्याने, प्रिमियम दर लागू करण्यात आला. प्रिमियम दरामुळे मागणी वाढेल त्याप्रमाणे तिकिटाच्या दरात वाढ होत असल्याने, तात्काळ तिकिटांसाठी आता हजार ते दीड हजार रुपये जादा मोजावे लागतात. 
 
नवी दिल्लीतून सुटणा-या राजधानी, दुरांतो, शताब्दी या पूर्णपणे वातानुकूलित एक्स्प्रेसच्या साधारण आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दर लागू करण्यात आला आहे. तीन महिने अगोदर मिळणाºया साधारण आरक्षित तिकिटांनाही प्रिमियम दर लागू झाल्याने साधारण आरक्षित तिकिटांचेही दर वाढणार आहेत. मिरजेतून येणाºया व जाणाºया यशवंतपूर-जोधपूर, यशवंतपूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसना प्रवाशांची मोठी गर्दी आहे. या गाड्यांसाठी यापूर्वीपासूनच साधारण आरक्षित तिकिटे व तात्काळ तिकिटांसाठी प्रिमियम दर लागू आहे. 
दोन साप्ताहिक एक्स्प्रेस वगळता अन्य एक्स्प्रेसना अद्याप तात्काळ तिकिटांसाठी प्रिमियम दर लावण्यात आलेला नाही. मात्र नेहमीच गर्दी असलेल्या एक्स्प्रेससाठी प्रिमियम दर लागू होऊन, आरक्षित तिकिटे महाग होण्याची प्रवाशांना भीती आहे. 
 
उपाययोजना अपु-या 
तात्काळ तिकिटांसाठी स्वतंत्र रांगेसह ओळखपत्राची सक्ती, तिकीट वाटपाची स्वतंत्र वेळ, स्वत:चे तिकीट स्वत: काढणाºया प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना अपुºया ठरल्याने, सामान्य प्रवाशांना प्रिमियम दराशिवाय सुरुवातीची दहा टक्क्यातील कमी किमतीची आरक्षित तिकिटे मिळविणे अशक्य ठरले आहे. मात्र तरीही सामान्य प्रवाशांना तात्काळ आरक्षित तिकिटे मिळत नसल्याने अनधिकृत तिकीट एजंटांकडून जादा दराने तिकिटे घ्यावी लागतात.
 

Web Title: Passengers are paid for premium tickets for railway tickets