मिरजेत रेल्वे स्थानक रस्त्यावर मारहाण करून प्रवाशाची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST2021-07-11T04:19:42+5:302021-07-11T04:19:42+5:30

मिरजेत रेल्वेस्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका प्रवाशाला मारहाण करून त्याचा मोबाईल काढून घेण्यात आला. शनिवारी भर दुपारी ...

Passenger robbed by beating on Miraj railway station road | मिरजेत रेल्वे स्थानक रस्त्यावर मारहाण करून प्रवाशाची लूट

मिरजेत रेल्वे स्थानक रस्त्यावर मारहाण करून प्रवाशाची लूट

मिरजेत रेल्वेस्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका प्रवाशाला मारहाण करून त्याचा मोबाईल काढून घेण्यात आला. शनिवारी भर दुपारी पुन्हा तिघांनी एकास मारहाण करून त्याचे अकराशे रुपये काढून घेतले. प्रवाशाने प्रतिकाराचा प्रयत्न केल्याने त्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवाशाने त्यांना रोखले. रेल्वेस्थानक रस्ता काँक्रिट कामासाठी दोन्ही बाजूनी पत्रे मारून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे येथे लुटमारीचे प्रकार वारंवार सुरू आहेत. येथील दुकानदार व व्यापाऱ्यांनाही व्यसनी तरुण दमबाजी करीत आहेत. पोलीस जुजबी कारवाई करीत असल्याने ते पुन्हा प्रवाशांची लूटमार करत आहेत. लूटमार करणाऱ्या नशेबाज तरुणांवर कठोर कारवाईची मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिसांत केली आहे.

Web Title: Passenger robbed by beating on Miraj railway station road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.