शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्रिपदासाठी शिवसैनिकांची लोटांगण यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 12:52 IST

आदित्य ठाकरे हेच या पदासाठी सर्वाधिक दावेदार असून त्यांना अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संधी मिळावी.

सांगली: युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून सांगलीतील शिवसैनिकांनी रविवारी लोटांगण यात्रा काढून गणरायाला साकडे घातले.

सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांपासून सकाळी ११ वाजता ही यात्रा काढण्यात आली. शिवसेनेचे हरीदास पडळकर यांनी शिवरायांना अभिवादन करीत लोटांगण घालण्यास सुरुवात केली. मारुती रोड, हरभट रोड, बालाजी चौक, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ ते गणपती मंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी पडळकर म्हणाले की, युतीचे सरकार असूनही गेल्या पाच वर्षात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.

सामान्य माणसांच्या प्रश्नांवर सतत आक्रमकपणे भांडणाऱ्या शिवसेनेला जनतेच्या भल्यासाठी मुख्यमंत्रिपद हवे आहे. विधानसभेवर भगवा भडकवून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवसेनेच्या आमदाराला मिळावी. आदित्य ठाकरे हेच या पदासाठी सर्वाधिक दावेदार असून त्यांना अभ्यासू व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून संधी मिळावी. शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा, ही जनतेचीसुद्धा मागणी आहे. त्यामुळे आम्ही जनतेची मागणी घेऊन शिवरायांना व गणरायाला साकडे घालण्यासाठी ही यात्रा काढली होती. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार याची मला खात्री आहे. यात्रेत शहरप्रमुख हरीभाऊ लेंगरे, प्रदीप शिंदे, सचिन वाघमोडे, प्रमोद सूर्यवंशी, विनायक येडके, अनिकेत खांडेकर आदी सहभागी झाले होते.

तुळजाभवानीलाही साकडे

पडळकर म्हणाले की, दरवर्षी आम्ही तुळजापूरला दुचाकी यात्रा काढीत असतो. तुळजाभवानी मातेलाही आम्ही राज्यात विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी प्रार्थना केली होती. आता यासंदर्भात तुळजाभवानी मातेकडेसाकडे घालणार आहोत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे