शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवांना ‘मामा’ बनविणारी टोळी, साखरपुड्यानंतर होते भावी वधू गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 05:54 IST

विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत.

- सचिन लाडसांगली : विवाह इच्छुक तरुणाच्या कुटुंबीयांना ‘मामा’ बनविणारी टोळी उघड झाली आहे. बोगस वधू, तिचे आई, वडील, मामा व नातलगांची नाटकी फौज नवरदेवाच्या कुटुंबीयांना आर्थिक गंडा घालत आहेत.ही टोळी बाहेरील जिल्ह्यातील नवरदेवाचा शोध घेऊन त्याला गाठतात. मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम नवरदेवाच्या घरात केला जातो. साखरपुडाही करण्यात येतो. साखरपुड्यावेळी एजंट नवरदेव कुटुंबाकडून घसघशीत कमिशन घेतात. मात्र, त्यानंतर ते गायब होतात.विवाहासाठी मुलींना विकण्याचा कर्नाटकातील काही गावांत व्यवसायच सुरू झाला आहे. ‘एका दिवसात विवाह जमवून देतो,’ अशी जाहिरातबाजी त्यांच्याकडून केली जात आहे. जाहिरात वाचून सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर भागातील नवरदेव कुटुंबीय या दलालांच्या संपर्कात येतात. मुलाचे लग्न होण्यासाठी ते वाट्टेल तेवढे पैसे मोजतात. नियोजित वधू व नवरदेव यांना एकमेकांना पाहण्याची बैठकही कर्नाटकातच घेतली जाते. मुलगी पसंत असल्याचा निरोप दिला की, दलालांकडून प्रथम पैशांची बोलणी सुरू होते. चार ते पाच लाखापर्यंत सौदा होतो. त्यामध्ये दलाल व वधूचे बोगस कुटुंबीय पैसे वाटून घेतात. लग्नाचा खर्चही नवरदेवाच्याच गळ्यात मारला जातो.फसवणूक झाली असेल, तर संबंधितांनी पोलिसांत तक्रार करावी. तक्रार दाखल झाल्यास अशा प्रकरणांचा छडा निश्चितपणे लावला जाईल. कोणताही अन्याय झाला, तर लोकांनी न घाबरता तक्रार दिलीच पाहिजे.- शशिकांत बोराटे, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.

टॅग्स :marriageलग्नSangliसांगली