मिरज : गोवा येथे आयोजित ऑल इंडिया ॲमॅच्युअर फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी दिल्ली संघात मिरजेतील रणवीर सोनवणे व अनस पटाईत यांची निवड झाली आहे. स्पर्धेसाठी मिरजेतील एस. एस. प्रॅक्टिस बॉईजचे कनिष्ठ व वरिष्ठ संघ रवाना झाले.
ऑल इंडिया ॲमॅच्युअर फुटबॉल चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील एस. एस. प्रॅक्टिस बॉईजचे कनिष्ठ व वरिष्ठ दोन संघ हे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. सांगली जिल्ह्यातील बेथेस्दा इंग्लिश स्कूलचे दोन खेळाडू रणवीर सोनवणे व अनस पटाईत हे दोन खेळाडू एपीएस दिल्ली या संघातून गोवा येथील फुटबॉल स्पर्धेत खेळणार आहेत. दोन्ही खेळाडूंना अश्रफ शेख यांनी मार्गदर्शन केले. मिरजेतील एक बलाढ्य संघ अशी ओळख असलेल्या एस. एस. प्रॅक्टिस बॉईज या संघाने विविध स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. एस. एस. प्रॅक्टिस बॉईजचे अध्यक्ष संदीप सलगर, डॉ. नियाज शेख, मुदस्सर पटाईत, युवराज सोनवणे, अमोल जाधव व प्रदीप मोरे या पदाधिकाऱ्यांनी, तसेच जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे संघास शुभेच्छा देण्यात आल्या. दोन्ही संघास प्रशिक्षक सहदेव हुलवान व विजय ठाणेदार यांचे मार्गदर्शन लाभले.