रक्तदान महायज्ञात राेटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:10+5:302021-07-17T04:21:10+5:30
ओळ : ‘लाेकमत’तर्फे आयाेजित रक्तदान शिबिरप्रसंगी पार्थ केळकर, पांडुरंग गयाले, अर्जुन भिसे, मल्लिका गुंडे, मयूरेश पाटील उपस्थित हाेते. सांगली ...

रक्तदान महायज्ञात राेटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचा सहभाग
ओळ : ‘लाेकमत’तर्फे आयाेजित रक्तदान शिबिरप्रसंगी पार्थ केळकर, पांडुरंग गयाले, अर्जुन भिसे, मल्लिका गुंडे, मयूरेश पाटील उपस्थित हाेते.
सांगली : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत नातं रक्ताचं’ या उपक्रमांतर्गत लोकमत व रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया हॉल येथे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली सांगलीच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याचे संयाेजन पार्थ केळकर, पांडुरंग गयाले, अध्यक्ष अर्जुन भिसे, सचिव मल्लिका गुंडे, मयूरेश पाटील, सिद्धी गोडबोले, जयेश सदावरे, कुणाल खांडेकर, आसावरी कुलकर्णी, शुभांग कुलकर्णी, प्रतीक शहा यांनी केले होते. या शिबिरात राजन पवार, अनिरुद्ध करगणीकर, सुकृत भिडे, शुभम कुलकर्णी, मयूर लाले, धैर्यशील वसा, प्रतीक शहा, ऋषिकेश शिरोटे, अभिषेक वैद्य, स्वप्निल कवठेकर, विद्याधर गवळी, सूरज बलुगडे, अतुल केळकर, अर्जुन भिसे, दत्तात्रय चोरगे, आरती कबाडगे, आसावरी कुलकर्णी यांनी रक्तदान केले.