मिरजेत इंग्रजी शाळेच्या शुल्क माफीसाठी पालक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:56+5:302021-02-05T07:23:56+5:30

मिरजेत अल्फ़ोन्सा स्कूलमध्ये शाळेचे वर्षाचे शुल्क भरण्याची पालकांना सक्ती करण्यांत आली आहे. या शुल्क वसुलीबाबत पालकांनी आक्रमक पवित्रा ...

Parents aggressive for English school fee waiver in Miraj | मिरजेत इंग्रजी शाळेच्या शुल्क माफीसाठी पालक आक्रमक

मिरजेत इंग्रजी शाळेच्या शुल्क माफीसाठी पालक आक्रमक

मिरजेत अल्फ़ोन्सा स्कूलमध्ये शाळेचे वर्षाचे शुल्क भरण्याची पालकांना सक्ती करण्यांत आली आहे. या शुल्क वसुलीबाबत पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शाळेच्या आवारात पालकांनी एकत्र जमून, शाळेच्या प्राचार्यांन‍ा वर्षाचे पूर्ण शुल्क भरण्याच्या सक्तीबाबत जाब विचारला. लॉकडाऊन काळात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणासाठी केवळ २५ टक्के फी आकारणी करावी अशी मागणी करण्यांत आली. शाळेच्या वसुलीच्या तगाद्यामुळे पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. लॉकडाऊनच्या काळात मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळाले नाही, कोरोना काळात आर्थिक अडचणी असल्याने पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ७५ टक्के व पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क माफ़ करावे या मागणीचे निवेदन प्राचार्य दिलीप सॅबस्टिन यांना दिले.

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी शाळेने खर्च केला आहे. यावर्षी विद्यार्थ्याचे २१ टक्के शुल्क माफ़ केले आहे. पालकांच्या शुल्कमाफीच्या मागणीबाबत शाळा व्यवस्थापन निर्णय घेईल असे प्राचार्य सॅबस्टिन यांनी सांगितले.

Web Title: Parents aggressive for English school fee waiver in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.