परशराम कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:25+5:302021-05-03T04:21:25+5:30
फोटो-०२परशराम कोरे निधन ----------- दत्तात्रय बिडकर विटा : येथील ज्येष्ठ गणेशमूर्ती कलाकार दत्तात्रय भीमाशंकर बिडकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने ...

परशराम कोरे
फोटो-०२परशराम कोरे निधन
-----------
दत्तात्रय बिडकर
विटा : येथील ज्येष्ठ गणेशमूर्ती कलाकार दत्तात्रय भीमाशंकर बिडकर (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी होते. गेली ५० वर्षे ते विटा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या गणेशमूर्तींना विटा व परिसरात मागणी असे. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शकुंतला बिडकर यांचे ते पती होत. तसेच, बांधकाम व्यावसायिक संतोष बिडकर, प्रमोद बिडकर व जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर यांचे ते वडील होत.
फोटो-०२दत्तात्रय बिडकर निधन
-------------
विशाल पवार
इस्लामपूर : शिरटे (ता. वाळवा) येथील सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे सदस्य व हॉटेल व्यावसायिक विशाल विलास पवार (वय ३३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, काका, काकी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पत्रकार निवास पवार यांचे ते पुतणे होत.
फोटो-विशाल पवार निधन