शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहांसोबत आमचे भविष्यही स्मशानातच गाडायचे की काय?, मृतदेहांसाठी खड्डे काढणाऱ्या परशुरामचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:29 IST

हे काय जगणे झाले का साहेब?, पोराबाळांची लग्ने कशी व्हायची

सांगली : गोकाक तालुक्यातील परशुराम हुळ्ळूरकर पोटाची आग विझविण्यासाठी सांगलीत आला. नवरा-बायको मिळून दफनभूमीत खड्डे काढायचे काम पत्करले. पाहता पाहता १८ वर्षे झाली,  पण या कामातून त्याची सुटका झाली नाही. आता मुलगाही याच कामाला जुंपला गेलाय. मृतदेहांसोबत आमचे भविष्यही खड्ड्यातच गाडायचे काय?, असा त्याचा सवाल लोकप्रतिनिधींच्या कानावर पोहोचलाच नाही.हरिपूर रस्त्यावर लिंगायत स्मशानभूमीत परशुराम पत्नी व दोन मुलांसोबत राहतो. काम संपल्यावर वणवण सुरू झाली. कंत्राटदाराने दफनभूमीतील काम सुचविले. लिंगायत स्मशानभूमीत मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम मिळाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला.हे काय जगणे झाले का साहेब?स्मशानातच मिळालेल्या घरात आम्ही राहतो. पावसात घरभर गळती होते. अशावेळी रात्रभर घराबाहेर अंगणात स्मशानाकडे पाहत बसून राहतो. याला जगणे कसे म्हणायचे? असे वाटल्यावाचून राहत नाही.

कधी एक, तर कधी तीन-चार

  • कोणीतरी मृत झाल्यावर. दफनासाठी खड्डा काढतो, तेव्हाच चार पैसे मिळतात.
  • कधी आठवड्यात एखादेच मृत येते, तर कधी चार-चारही येतात. 

आता तर मुलेही बिनधास्त झाली.....परशुराम म्हणतात, सुरुवातीला स्मशानात राहायला भीती वाटायची. पण नंतर सवय होत गेली. आता तर मुलेही बिनधास्त झाली आहेत. लहानगा किरण तर दफनासाठी खड्डा काढण्याचे कामही करत आहे.

पोराबाळांची लग्ने कशी व्हायची?परशुराम म्हणतात, आम्ही नवराबायकोने स्मशानात आयुष्य काढले, पण स्मशानात राहणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली कोण देणार, याची चिंता आहे.

पुढील पिढीही स्मशानातचमोठा मुलगा शंकरने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आता त्याला कोठेतरी कामावर चिकटविण्यासाठी धडपड सुरू आहे. लहानगा किरण मात्र माझ्यासोबतच स्मशानात खड्डे काढायचे काम करत त्याचे शिक्षण फारसे झाले नाही.

टॅग्स :Sangliसांगली