फोटो ओळ : पलूस नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी परशुराम शिंदे यांनी मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी गटनेते सुहास पुदाले, संदीप सिसाळ, ऋषिकेश जाधव आदी उपस्थित होते.
पलूस : पलूस नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजाराम सदामते यांच्या निधनानंतर रिक्त पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सत्ताधारी काँग्रेसकडून नगरसेवक परशुराम शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. यामुळे या पदावर त्यांची निवड निश्चित झाली आहे.
पलूसचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून राजाराम सदामते निवडून आले होते. मात्र ८ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले होते. यामुळे रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पदासाठी मागास प्रवर्गाचे आरक्षण आहे. यामुळे सत्ताधारी गटातून उपनगराध्यक्षा सुनीता कांबळे व नगरसेवक परशुराम शिंदे यांची नावे चर्चेत होती. यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंगही लावली होती. पण राज्यमंत्री विश्वजित कदम, महेंद्र लाड आणि स्थानिक नेत्यांनी अखेर परशुराम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
यामुळे शनिवारी परशुराम शिंदे यांनी मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला. यावेळी गटनेते सुहास पुदाले, संदीप सिसाळ, ऋषिकेश जाधव, विशाल दळवी, अमोल भोरे, दिलीप मोरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
210821\img-20210821-wa0011.jpg
पलूस