पेपर फुटीचा विषय गाजणार

By Admin | Updated: December 23, 2015 01:21 IST2015-12-23T00:57:29+5:302015-12-23T01:21:06+5:30

अधिकारी अडचणीत : आज स्थायी समिती सभा

Paper will be the subject of the spin | पेपर फुटीचा विषय गाजणार

पेपर फुटीचा विषय गाजणार

सांगली : जिल्हा परिषद आरोग्य सेविका परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण आणि कृषी विभागाकडील सौर पथदिवे व अभ्यासिकेच्या कामास मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर बुधवारी, दि. २३ रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ठेकेदारांना बेकायदेशीर मुदतवाढ देण्यावरूनही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची बुधवारी होणारी ही शेवटचीच स्थायी समिती सभा आहे. यामुळे अनेक विषयांना मंजुरी देण्यावर पदाधिकाऱ्यांचा भर आहे. पण, यास अनेक सदस्य जोरदार विरोध करणार असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाकडून सौर पथदिवे व अभ्यासिकांचे सव्वा कोटीचे काम एका ठेकेदाराला दिले आहे. ठेका देतानाच, दोन महिन्यात काम पूर्ण करण्याची अट घातली होती. परंतु, ठेकेदाराने ते काम पूर्ण केले नसल्यामुळे त्यांचे काम नियमानुसार रद्द होणार आहे. पण, काही पदाधिकारी या ठेकेदारास काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचाही हात आहे. परंतु, बहुतांश सदस्यांचा यास विरोध असणार आहे. कारण, तीन लाखाच्या वरील सर्व कामांची ई-निविदा करण्याचा शासनाचा नियम आहे. त्यानुसार सव्वा कोटीचे काम असणाऱ्या उपक्रम खरेदीची निविदाच काढण्याच्या मागणीवर सदस्य आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
याबरोबरच आरोग्य सेविका भरतीमधील पेपर कसा फुटला?, या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी यामध्ये कसे सापडले, यासह अनेक प्रश्नावर सदस्य अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचा समाचार घेणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे. पोलिसांनीही सूत्रधारापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणीही सदस्य सभेत करणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Paper will be the subject of the spin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.