इस्लामपूरच्या पंगत शिवभोजन केंद्रातर्फे मुख्यमंत्री निधीला ६१ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:28 IST2021-07-28T04:28:04+5:302021-07-28T04:28:04+5:30
मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंगत शिवभोजन केंद्राकडून ५१ हजार रुपयांचा निधी आनंदराव पवार, रणजित शिंदे यांनी ...

इस्लामपूरच्या पंगत शिवभोजन केंद्रातर्फे मुख्यमंत्री निधीला ६१ हजारांची मदत
मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंगत शिवभोजन केंद्राकडून ५१ हजार रुपयांचा निधी आनंदराव पवार, रणजित शिंदे यांनी दिला. यावेळी शंभोराजे देसाई उपस्थित होते. फोटो-
मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंगत शिवभोजन केंद्राकडून ५१ हजार रुपयांचा निधी आनंदराव पवार, रणजित शिंदे यांनी दिला. यावेळी शंभोराजे देसाई उपस्थित होते. लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील पंगत शिवभोजन केंद्राच्यावतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१ हजार रुपये आणि १० हजार रुपये जिल्ह्यातील पूरग्रस्त निधीसाठी अशा ६१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या पुढाकाराने नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश पंगत शिवभोजन केंद्राचे संचालक रणजित शिंदे यांनी सुपूर्द केला, तर पूरग्रस्तांसाठीचा १० हजार रुपयांचा निधी तहसीलादर रवींद्र सबनीस यांच्याकडे दिला.
हे शिवभोजन केंद्र चालविणाऱ्या गृहिणी शिंदे म्हणाल्या, एक घर सांभाळताना काय कसरत होते, याची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहेत. ते यशस्वीपणे जबाबदारी पेलत आहेत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राची सेवा करत आहेत. याचा एक गृहिणी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभोराजे देसाई, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, रणजित शिंदे, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, डॉ. सचिन पाटील, उद्योजक संदीप सपकाळ, विनोद शेटे उपस्थित होते.
चौकट
मिठाई वाटप..!
येथील पंगत शिवभोजन केंद्राच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० गरजू नागरिकांना मोफत जेवण आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक शकील सय्यद, राजेंद्र पवार, प्रदीप लोहार, राहुल टिबे, योगेश हुबाले उपस्थित होते.