सांगली जिल्ह्यातून युवा खेळाडूंची फळी निर्माण होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:29 IST2021-02-05T07:29:08+5:302021-02-05T07:29:08+5:30
इस्लामपूर : युवा नेते प्रतीक पाटील यांची सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने संघटनेला गतिमान नेतृत्व मिळाले आहे. ...

सांगली जिल्ह्यातून युवा खेळाडूंची फळी निर्माण होईल
इस्लामपूर : युवा नेते प्रतीक पाटील यांची सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने संघटनेला गतिमान नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात सांगली जिल्ह्यातून युवा खेळाडूूंची फळी निर्माण होईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील यांनी व्यक्त केला.
येथील उरुण परिसरातील पाटील भजनी मंडळातर्फे प्रतीक पाटील यांचा भगवान पाटील आणि राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा विविध खेळांतील खेळाडूंची जन्मभूमी व कर्मभूमी आहे.
प्रतीक पाटील म्हणाले, जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही एक संधी मानून खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी जोमाने प्रयत्न करेन. खेळाडू आणि संघटनेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याला प्राधान्य देऊ. जिल्ह्यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपले खेळाडू जावेत, यासाठी सर्वांना सोबत घेत योगदान देईन.
यावेळी अर्बन बॅँकेचे अध्यक्ष संदीप पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक संजय पाटील, राजारामबापू कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, शंकरराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शिवराज पाटील, प्रा. शरद पाटील, अभिजित पाटील, शैलेश पाटील उपस्थित होते.
फोटो २५०१२०२१-आयएसएलएम-व्हॉलीबॉल न्यूज
इस्लामपूर येथे प्रतीक पाटील यांचा भगवान पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शामराव पाटील, संदीप पाटील, दादासाहेब पाटील उपस्थित होते.