शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: पावसामुळे पानमळ्यांना फटका, पान उत्पादक चिंतेत; मिरज तालुक्यात किती हेक्टर क्षेत्र.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:15 IST

शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

दिलीप कुंभारनरवाड : मिरज तालुक्यातून होणाऱ्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील पान उत्पादक शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला असून भविष्यात पानमळे टिकणार का? हा चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरज तालुक्यात सुमारे १९० हेक्टर क्षेत्रावर पानमळे असून यामध्ये प्रामुख्याने नरवाड, बेडग, मालगाव, आरग याठिकाणी सुमारे ८५ हेक्टर पानमळे आहेत. मे महिन्यांपासून पावसाने तालुक्याला उसंत दिली नसल्याने याचा सर्वाधिक फटका पानमळा पिकास बसला आहे. कारण पानमळ्यातील खाऊच्या पानवेलीला पाणी अधिक चालत नाही. पानवेलींची मुळे नाजूक असल्याने पावसाचे प्रमाण जास्त होऊन मुळे कुजून जातात. परिणामी पानवेली सुकून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. असाच प्रकार चालू पावसाने झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने पानवेलींच्या मुळ्या कुजून याचे स्पष्ट परिणाम येणाऱ्या हिवाळ्यात जाणवू लागण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. अगोदरच म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळ्या जमिनीलगत आल्या असताना सध्या पडत असलेल्या पावसामुळे पानवेलींचे आयुर्मान कमी होणार आहे. पानवेलींच्या मुळ्या सुकू लागताच पानवेलींचा खुडा मंदावून अखेर बंद पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

पानमळ्याला पावसाळ्यातील पाणी नियोजन अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे असून पावसाळ्यात पानमळ्याच्या वाफ्यात पाणी अजिबात साठू न देता ते पानमळ्याच्या बाहेर काढून दिले पाहिजे. -संगीता पवार, सहाय्यक कृषी अधिकारी 

चालू वर्षी पानमळा पिकास पाऊस जास्त झाल्याने पानवेलींची मुळे कुजून शेतकऱ्यांचे येणाऱ्या हिवाळ्यात पूर्णपणे नुकसान होणार असून याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पानमळा पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. -मधूकर जाधव, पान उत्पादक शेतकरी, नरवाड