इंधन दरवाढीविरोधात पलुसला काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST2021-07-14T04:31:45+5:302021-07-14T04:31:45+5:30
पलुस : इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस तालुका काँग्रेस कमिटी, पलुस-कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस ...

इंधन दरवाढीविरोधात पलुसला काँग्रेसचे आंदोलन
पलुस : इंधन दरवाढीच्या विरोधात राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलुस तालुका काँग्रेस कमिटी, पलुस-कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस कमिटीने सोमवारी आंदोलन केले. या वेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलांच्या व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि हे वाढलेले दर कमी करावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य खाशाबा दळवी, ज्येष्ठ नेते जे. के. बापू जाधव, सर्जेराव पवार, बी. डी. पाटील, गणपतराव सावंत, सत्यविजय बँकेचे प्रशांत पवार, मिलिंद डाके, श्यामराव गायकवाड, विक्रम पाटील, युवक काँग्रेसचे प्रमोद जाधव, विजय जाधव, प्रणाली पाटील, सुधीर जाधव, अक्षय सावंत, विश्वास येसुगडे, संभाजी कदम, पी. सी. पाटील, माणिक पवार सहभागी झाले होते.
120721\img-20210712-wa0045.jpg
काँग्रेस मोर्चा फोटो पलूस