पलूसला पाच बांधकाम साहित्य दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:44+5:302021-04-25T04:26:44+5:30
पलूस : येथील पाच बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर लॉकडाऊनचे नियम मोडल्याने पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यांना दंड ठोठावला. यापुढे जर ...

पलूसला पाच बांधकाम साहित्य दुकानांवर कारवाई
पलूस : येथील पाच बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर लॉकडाऊनचे नियम मोडल्याने पोलिसांनी धडक
कारवाई केली. त्यांना दंड ठोठावला. यापुढे जर कोणी कोरोनाच्या रोगप्रतिबंधक आदेशाचा भंग केला, तर कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिला.
तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीचा आदेश दिला आहे. पलूस शहरात पोलिसांकडून एकदा सूचना देऊनही या आदेशाचा भंग करून येथील न्यू बॉम्बे स्टील, बॉम्बे स्टील, पार्वती स्टील, शिवशंभो स्टील, जलाराम ट्रेडर्स ही दुकाने राजरोस सुरूच ठेवून सर्व नियम धाब्यावर बसविले जात होते. एकप्रकारे ते कोरोनाला आमंत्रणच देत होते. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई अरविंद कोळी, गिरीश मोरे, रमेश किरपेकर, राकेश भोपळे यांनी केली.