पलूस नगर परिषदेचे विकासकामांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:24 IST2021-01-21T04:24:28+5:302021-01-21T04:24:28+5:30
पलूस : येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नंदिवाले वसाहतीलगत असणाऱ्या गटाराचे केवळ तीस टक्केच बांधकाम पूर्ण झाले असून, दोन ...

पलूस नगर परिषदेचे विकासकामांकडे दुर्लक्ष
पलूस : येथील प्रभाग क्रमांक पाचमधील नंदिवाले वसाहतीलगत असणाऱ्या गटाराचे केवळ तीस टक्केच बांधकाम पूर्ण झाले असून, दोन वर्षे या कामाकडे नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची टीका क्रांती साखर कारखान्याचे संचालक दिगंबर पाटील यांनी केली आहे.
पाटील यांनी अर्धवट स्थितीतील गटार बांधकामाची पाहणी केली. ते म्हणाले की, येथील गटार कामासाठी १२ लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर असताना आणि २३० मीटर लांब गटार मंजूर असताना केवळ ६८ मीटर काम झाले आहे. दोन वर्षे काम बंद आहे. या उघड्या गटारात पडून अपघात झाले आहेत. सांडपाणी साचून त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण न केल्यास आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे पलूस शहराध्यक्ष किशोर माळी, आनंदराव निकम, राहुल जगताप, अमोल पाटील, नंदकुमार पाटील, मंगेश मोकाशी उपस्थित होते.