पलूस शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:23 IST2021-04-03T04:23:08+5:302021-04-03T04:23:08+5:30

पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'वार्तापत्र' प्रकाशन सोहळा व सौरऊर्जा प्रकल्प उदघाटनसमारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

Palus Educational Institution maintained social commitment | पलूस शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली

पलूस शिक्षण संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली

पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित 'वार्तापत्र' प्रकाशन सोहळा व सौरऊर्जा प्रकल्प उदघाटनसमारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. के. पाटील होते.

एस. के. पाटील म्हणाले, ही संस्था स्थापनेपासून म्हणजेच ६३ वर्षे अत्यंत चांगल्याप्रकारे कार्य करीत असून सामाजिक बांधिलकी जोपासत आहे.

संस्थेचे सचिव धोंडिराम शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, उपाध्यक्षा डॉ. आशा पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पुदाले, मॅनेजिंग कमिटी चेअरमन प्रा. एम. ए. पाटील, व्हा. चेअरमन जयंत कदम, संचालक वसंत गायकवाड, जगन्नाथ सांडगे, सौरऊर्जा प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश माळी, संस्थेच्या सर्व शाखांचे विभाग प्रमुख, शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विकास आरबुने व एन. के. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगीता पाटील यांनी केले. तर प्रा. डॉ. पी. एम. पाटील यांनी आभार मानले.

फोटो-०२पलुस१

Web Title: Palus Educational Institution maintained social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.