पलूस बँकेस १३ कोटी रुपयांचा नफा : वैभवराव पुदाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:50+5:302021-04-04T04:26:50+5:30
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील तरतुदी पूर्व १३ कोटी नफा झाला असून बॅंकेचा एकूण व्यवसाय ६८५ कोटींवर गेला आहे. ...

पलूस बँकेस १३ कोटी रुपयांचा नफा : वैभवराव पुदाले
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील तरतुदी पूर्व १३ कोटी नफा झाला असून बॅंकेचा एकूण व्यवसाय ६८५ कोटींवर गेला आहे. एनपीएचे प्रमाण शून्य टक्के करण्यात बॅंकेला यश आले आहे.
उपाध्यक्ष शामराव डाके म्हणाले, बॅंकेच्या ठेवी ४०३ कोटी रुपये आहेत. कर्जे २८३ कोटी आहेत. बॅंकेच्या कर्जे आणि ठेवींचे प्रमाण योग्य ठेवून आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. गत वर्षीच्या व्यवसायात ३० टक्के वाढ झाली आहे.
बॅंकेचे मुख्य कार्यकारी संचालक अनिल घारे म्हणाले, बॅंकेने पारदर्शक कारभार करून सर्व प्रकारच्या सुविधा ग्राहकांना दिल्या आहेत. सीआरएआरचे प्रमाण १५ टक्के पेक्षा अधिक आहे. लवकरच कवठेमहांकाळ व शिरोली औद्योगिक वसाहत येथे शाखा सुरू केली जाणार आहे. यावेळी विष्णू सीसाळ, प्रकाश पाटील, महिपती जाधव, किसान इदाटे, लालसाहेब संकपाळ, चंद्रकांत गोंदील, नारायण सगरे, वरिष्ठ अधिकारी सुहास पुदाले, प्रकाश डाके आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.