नेर्ले (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस जबर मारहाण करीत लूटमार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी दोघा आरोपींना ३ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येक ...
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...
सांगली येथील आमराईजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन मोटारींची काच फोडून चोरट्यांनी सात हजाराची रोकड, पॅनकार्ड व लॅपटॉप लंपास केला. शुक्रवारी भरदिवसा दोन वाजता ही घटना घडली. घटनेची रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद नव्हती. ...
अवघड क्षेत्रात काम, पती-पत्नी एकत्रीकरण व गंभीर आजार अशा तीन प्रकारातील शिक्षकांची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील ३८२ जणांच्या प्रशासकीय, तर अधिकारप्राप्त खो पध्दतीमुळे आणि सर्व तालुक्यात समान पदे ठेवण्यासाठी ५०८ अशा ८९० शिक्षकांच्या बदल्या जिल्हा परिषदे ...
गावठी पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेतलेल्या कापूसखेड (ता. वाळवा) येथील संग्राम धोंडिराम पाटील (वय ३३) या वकिलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या चार दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुर ...
सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले. ...
इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील कापूरवाडी हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी पेठ येथील युवकाचे गुरुवार दि. २६ रोजी कऱ्हाड येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माणिक आनंदराव माळी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवार दि. १७ रोजी झाला होता. ...
दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थांचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत ९ लाख ८८ हजार १० रुपयांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त एस. बी. कोडगीरे यांनी दिली. ...